अविनाश कोठाळे
जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य कार्यालयात3जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती दिनापासून ते 12 जानेवारी जिजाऊ जयंती पर्यंत दशरात्रौ महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अतिथी श्री सेऊल ऊके आरबीआय व्यवस्थापक हे होते. सावित्रीबाई फुले यांचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाचा अभाव असणाऱ्या महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणारे असून असंख्य महिला त्यांच्यामुळे शिक्षित झाल्या व आज आपण शिक्षित महिलांना आर्थिक संपन्न करण्यासाठी ऊद्योजकता वआर्थिक साक्षरता कार्यशाळांमधुन शिक्षण दिले पाहिजे असे ऊके म्हणाले. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी सन 2024- 25 हे आर्थिक वर्ष जिजाऊ बँकेचे रोप्य महोत्सवी वर्ष असल्याने उद्योग वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले असुन बँकेने विविध सुलभ ऊद्योग कर्ज आणि आकर्षक ठेवीच्या योजना आणलेल्या आहे.1लक्ष ते 3.50कोटी पर्यंत विविध आकर्षक कर्ज योजना अंतर्गत ग्रीन एनर्जी संकल्पा द्वारे सौर ऊर्जा द्वारे अत्यल्प व्याजदरात प्रत्येक घरमालकास बँक3ते5केव्ही विजनिर्मितीसाठी सौर ऊर्जेसाठी शासनाच्या रु.78हजार सबसीडी योजनेचे कर्ज जिजाऊ बँकेच्या ११शाखांमधुन अमरावती,अकोला,यवतमाळ,नागपुर येथील नागरीकांना देणार आहे. युवकांसाठी व व्यावसाईकांसाठी बँक निवृत्ती योजना लागू करणार असल्याचे अध्यक्ष यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या काळात अशिक्षित महिलांना शिक्षित केले तर जिजाऊ बँक महिलांना आर्थिक साक्षर करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. बँक सभासदांच्या कार्यशाळामधुन महिलांना आर्थिक साक्षर करणार असल्याचे त्यांनी सांगितले .बँकेच्या अकरा शाखांमधून दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती ते जिजाऊ जयंती विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात असे ते म्हणाले.
याप्रसंगी हरप्रित सिंग आरबीआयअधिकारी यांनी मनोगतात सहकारी बँकाची जबाबदारी ठेवींदारांचे हीत संरक्षण करणे असल्याचे सांगितले.अतिथिंचे स्वागत पुस्तकभेटदेऊन बँक पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखडे यांनी केले .कार्यक्रमाला बँकेचे ऊपाध्यक्ष प्रदिप चौधरी व बँकेचे अधिकारी ,कर्मचारी व्रुंद ऊपस्थित होते.संचालन हरीष नाशिरकर ऊप मुकाअधिकारीयांनी केले व आरबीआय अधिकारी राष्ट्गीता प्रती जागरुक असुन कामाप्रतीअत्यंत शिस्तप्रिय असल्याचे सांगितले.तर अर्चना बारबुदे प्रशासन अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले व सावित्रीच्या लेकी करिता सुंदर कविता़ म्हनुन कार्यक्रमाची सांगता झाली.