जिजाऊ बँकेस मिलिंद आकरे अतिरिक्त सहकार आयुक्त यांची सदिच्छा भेट:

0
50

नागरी सहकारी बँक संचालकांनी सहकारी संस्थांच्या ऊपविधींचा अभ्यास करुण शेती पुरक ऊद्योगास प्राधान्य देऊन समाज आर्थिक बळकट करावा

सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया बळकट करण्याचे प्रभावी माध्यम असुन ग्रामीण अर्थव्यवस्थे मध्ये नागरी सहकारी बँकांच्या संचालकांनी महत्त्वाचा वाटा उचलला पाहिजे अशी अपेक्षा मिलींद आकरे अतिरीक्त आयुक्त सहकार यांनी व्यक्त केली. जिजाऊ बँकेने सन २०२५ हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने हजार कोटी चा बिजनेस बँकेने करायला पाहिजे अशी अपेक्षा जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य कार्यालयात मिलिंद आकरे अतिरिक्त आयुक्त सहकार विभाग पुणे यांनी भेट दिली असता व्यक्त केली. जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी त्यांचे प्रथम आगमनाप्रसंगी बँकेत स्वागत केले .याप्रसंगी अविनाश कोठाळे यांनी बँकेची 425 कोटीच्या ठेवी 277 कोटीची कर्ज वाटप बँकेचा एनपीए 31 मार्च 24 ला तीन टक्के च्या आत रिझर्व बँकेच्या निर्धारित मापदंडानुसार जिजाऊ बँक फायनान्सिएल साऊंडअन्ड वेल मेनेज बँकेचे मापदंड पुर्ण करित असल्याचे सांगितले. सहकारीबँकाना 31मार्च च्या ताळेबंदानुसार संविधानिक अंकेक्षणानुसार 3टक्केच्या आत अनुत्पादक कर्जाची अट पुर्ण करित असल्यास आणी ईतर मापदंड बँका पुर्ण करित असल्यास सुपरवाईझरि अँक्शन फ्रेममधुन आरबीआयने वगळण्याचे धोरण अवलंबिले पाहिजे असे प्रतिपादन अध्यक्ष कोठाळे यांनी केले. याप्रसंगी आखरे यांनी सहकारी बँकेचे सर्व संचालक यांनी त्यांच्या संस्थाच्या उपविधीमध्ये असलेले बँकेचे उद्दिष्ट व ते साध्य करण्यासाठी संचालकांनी केलेले प्रयत्न अत्यंत आवश्यक आहे व अनेक संस्था पुर्ण करतांना दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे असंख्य बँकांना 30ते40 वर्षाच्या काळात हजार कोटीचे उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. नागरी सहकारी बँका या अर्थ विकासाचा कणा असल्याने आपला प्रदेश विकसित करायचा असेल तर या दृष्टीने संचालकांनी ग्रामीण भारताशी नातं ठेवून ग्रामिण समस्यांच्या जाणीव ठेऊन शेतीशी निगडित उद्योगांवर भर दिला पाहिजे . तालुकास्तरावरील लोक मोठ्या प्रमाणात नागरि बँकेची जोडले असल्याने नागरी सहकारी बँकांनी त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर अर्बन कॉपरेटिव्ह बँक यांचा बिझनेस वाढेल आणि त्याद्वारे ग्रामीण प्रदेश विकसित होईल. नागरी बँकांनी अत्याधुनिकेशी साथ धरून कौशल्य विकसित करून जुन्या जाणत्या ग्राहकांना एकत्र करून चांगल्या ग्राहकांना सिबिलनुसार परतफेडीच्या क्षमतेनुसार कमी व्याज दराने कर्ज देण्याच्या योजना आखल्या पाहिजे. ग्रामीण भागातील युवकांना विविध कर्जदारांना बँकेने जोडून आपला आर्थिक व्यवहाराचा धंदा मजबूत केला पाहिजे. युवकांना सहकार्य करतांना जिल्हा उद्योग केंद्र आर्थिक विकास मंडळ तसेच असंख्य सबसिडीच्या योजनांचा समावेश युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत केली तर आपल्या कार्यक्षेत्राताची आर्थिक प्रगती होऊ शकते, तेव्हा नागरी सहकारी बँकांनी रिझर्व बँकेच्या धोरणानुसार बँकिंग व्यवसाय चालवतांनी नियम, शिस्त, पाळावी तसेच युवकांना स्वभाविष्ट करावे असे आवाहन त्यांनी केले. सहकार वृद्धिंगत करण्यासाठी संचालकांनी पुढाकार घ्यावा. भविष्यात रिझर्व बँक ज्या बँकांचा 1000कोटीपेक्षा कमी बिझिनेस असल्यासअश्या सहकारी व विक बँका एकत्रित करून एक मोठी सक्षम बँक ठेवण्याचे निर्देश देवु शकेल.तेव्हा बँकांनी एनपीए नियंत्रित ठेवण्यासाठी वसुली योग्य प्रकारे करावी व सहकार खाते 101चे वसुली दाखले नियमानुसार वेळेवर देऊन सर्व संस्थांना मदत करेल असे ते म्हणाले. नागरी सहकारी बँकांच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी आणून बँकांचा विकास करावा व प्रत्येक नागरी बँकांनी व कर्मचारी व्रुदांनी समाजाचे सर्व घटक एकसंघ करुण 1000कोटी बिझीनेस साठी नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले.जिजाऊ बँक सहकारी क्षेत्रातीलअग्रगण्य बँक असुन युवकांना रोजगाराभिमुख करण्याचा बँकेचा प्रयत्न ऊत्तम असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी सेवानिव्रुत्त माजी ऊपनिबंधक दाते यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला बँकेचे ऊपाध्यक्ष प्रदीप चौधरी,संचालक नितिन डहाके,अनिल टाले,प्रशांत गावंडे,तद्न संचालक भैय्यासाहेव निचळव ईजी.सुरेन्द्र दाळु,नितीन वानखडे मुख्य अधिकारी,ईत्यादी हजर होते.संचालन व प्रास्तविक हरिष नासिरकर ऊप मुकाअ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here