डोळे चोळण्याची तुमची सवय आताच करा बंद! तज्ज्ञांनी सांगितला हा धोका

0
44

आपल्यापैकी अनेकांना वारंवार डोळे चोळण्याची सवय असते. हे जरी धोकादायक वाटत नसले तरी फिजिकल थेरपिस्ट डॉ. आकिब जमालसारखे तज्ज्ञ याची शिफारस करत नाहीत. त्यांच्या मते, डोळ्यांच्या आजूबाजूला जोरजोरात चोळण्यापेक्षा थोड्या प्रमाणात हलक्या दबावाने चोळणे चांगले. पण असे का?

डॉ. मनेंद्र, सल्लागार आणि एचओडी क्रिटिकल केअर विभाग, ग्लेनेगल हॉस्पिटल्स, हैदराबाद म्हणाले की, तुमचे डोळे चोळणे तुम्हाला धोकादायक वाटत नसले तरी त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

“खूप जोरात घासल्यामुळे नाजूक ऊतींना इजा होऊ शकते, ज्यामुळे कॉर्नियाचे ओरखडे होतात किंवा केराटोकॉणससारखी कंडिशन होऊ शकते ज्यात कॉर्निया पातळ होतो. या सवयीमुळे सूक्ष्म रक्तवाहिन्या फाटून लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते,” असे डॉ. मनेंद्र म्हणाले.

तज्ज्ञांनी सांगितले की, जेव्हा आपण डोळे चोळतो, विशेषतः अस्वच्छ हातांनी, तेव्हा बॅक्टेरिया आणि घाण डोळ्यात जाऊ शकते, ज्यामुळे conjunctivitis (डोळ्यांचा संसर्ग) होऊ शकतो. “आपल्या डोळ्यांना स्पर्श करण्याचा योग्य मार्ग म्हणजे आपल्या हातांना स्वच्छ ठेवणे. अस्वच्छ हातांनी थेट डोळा चोळू नका. जर त्यांना खाज सुटली असेल किंवा तुम्हाला त्रासदायक वाटत असेल, तर कोल्ड कॉम्प्रेस थेरपीचा वापर करा,” असे डॉ. मनेंद्र यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here