नियोजित वराला आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवून तरूणीची केली बदनामी

0
20

अमरावती : एका तरुणीच्या नियोजित वराला बनावट आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवून तिची बदनामी करण्यात आली. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अभियंता तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीतेज राजेंद्र नागपुरे (२९, रा. रुक्मिणीनगर, अमरावती) गुन्हा दाखल झालेल्या अभियंता तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणी व श्रीतेज यांची मैत्री होती. प्रशिक्षणासाठी सोबत असताना श्रीतेज आणि पीडित तरूणीमध्ये प्रेमसंबंध झाले. २०१४ पासून ती पुढील शिक्षणाकरिता पुणे येथे गेली.

त्यामुळे श्रीतेजनेही पुण्याला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे पीडित तरूणी व श्रीतेज हे दोघे एकमेकांना भेटत होते. दरम्यान, काही दिवसांनी तो तरुणीवर जास्त लक्ष ठेवायला लागला. त्याला कंटाळून २०१८ मध्ये या तरुणीने त्याच्यासोबत संबंध तोडून टाकले. तत्पूर्वी, त्यांचे प्रेमसंबंध सुरू असताना तरुणीची काही छायाचित्रे श्रीतेजच्या मोबाइलमध्ये होते. २०१९ मध्ये तरुणी ही नोकरी करत असताना श्रीतेज तिला वारंवार मोबाईलवर संपर्क साधून त्रास देत होता. तरुणीच्या बहिणीला सुद्धा त्याने तुम्ही संबंध तोडण्यास संमती कशी दिली, अशी विचारणा करून त्रास दिला. श्रीतेज हा कंपनीतील इतर सहकाऱ्यांना छायाचित्रे ठेवून तिची बदनामी करत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here