ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील घोडबंदर मार्गाला समांतर उभारण्यात येणाऱ्या खाडी किनारा मार्गासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने दिलेल्या २७०० कोटी रुपयांच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिवरांच्या जंगलांची होणारी कत्तल, सागरी किनारा नियमनाचे कठोर कायदे, नौदलाच्या जागेस खेटून उभारणीमुळे संरक्षण विभागाकडून हरकती असताना व सर्व आवश्यक परवानग्या हाती येण्यापूर्वीच कंत्राट देण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेषम्हणजे निवडणूक रोखे खरेदी प्रकरणी चर्चेत आलेल्या ‘मेसर्स नवयुग इंजिनीअरिंग कंपनी’ला हे काम देण्यात आले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाईघाईत हे कंत्राट दिल्याचे बोलले जात आहे………
Home Uncategorized परवानग्यांशिवाय २७०० कोटींचे कंत्राट, ठाणे खाडी किनारामार्गाचे गौडबंगाल; निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह