अमरावती : कुठल्याही कारणावरून सार्वजनिक ठिकाणी बाचाबाची आणि त्याचे रुपांतर हाणामारी होण्याच्या घटना नवीन नाहीत. अनेकदा क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला जातो. कुणीही वाद सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही. पण, आज अनेकांच्या हाती आलेल्या मोबाईलमध्ये या गोष्टी चित्रित केल्या जातात आणि त्या लगेच समाज माध्यमांवर प्रसारित होतात.
अशाच प्रकारची एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी बसस्थानक परिसरात घडली. या ठिकाणी चार महिला आणि तरुणींमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. या घटनेची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दोन महिला आणि दोन तरुणींमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद होतो आणि त्याचे रुपांतर लगेच हाणामारीत होते. एक तरुणी साडी परिधान केलेल्या महिलेचे केस धरून तिला ओढत नेते. या महिलांमध्ये चांगलीच हाणामारी होते. या महिलांनी एकमेकींना जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. मोर्शीच्या बसस्थानकावरील हा प्रकार असल्याचे सांगण्यात आले आहे……….