दि.२२/११/२०२४ रोजी अनभोरा येथील भाऊसाहेब बिडकर विद्यालय या
शाळेत शिकत असलेले मुले मुलि यांना मधल्या १२ वाजताच्या सुट्टीत मुले-मुली बाथरुमला गेले त्या लेवेळात शिक्षक किरण इंगळे सर यांनी शाळेच्या वर्गाचे दार बंद करून चार मुलांना शिकवत होते तर त्यावेळेस सर्व दहाविचे मुले मुली बाहेर उभे होते! २ वाजताच्या सुट्टीत नंतर सर्व मुले शाळेच्या वर्गात घेतले,
अर्जदाराची मुलगी कु.सुप्रिया तेजराव जाधव ही दहावीत शिकत आहे याआधी सुध्दा किरण इंगळे सर विद्यार्थ्यांना सोबत अशिक्षीत सारखे वागत असत, याआधी मुख्याध्यापक इंगळे सर हे सुध्दा बरोबर शिक्षणावर लक्ष देत नाही असे दिसुन आले आहे. वर्गात किरण सर सांगतात पैसे देवुन कोणतेही प्रकरण सोडवु शकतात अशा प्रकारे धमक्या वर्गात देतात या आधी अर्जदाराने करण इंगळे सर यांची तक्रार बदलीसाठी केली होती त्या प्रकरणात पैसे देऊनच प्रकरण दाबदुब केल्याचे दिसुन आले तसेच परिक्षा केंद्रावर सेन्टरवर किरण सर याची ड्युटी लावण्यात येवु नये व विद्यार्थ्यावर दि.२२/११/२०२४ रोज अन्याय झाला त्यांना व अर्जदारांच्या मुलींला न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली….