विधानसभा निवडणुकीचं मतदान जसंजसं जवळ येत आहे. तसंतसं राजकीय आरोप-प्रत्यारोपानं चांगलाच जोर पकडला आहे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला घरचा आहेर दिला आहे,
विधानसभा निवडणुकीचं मतदान जसंजसं जवळ येत आहे. तसंतसं राजकीय आरोप-प्रत्यारोपानं चांगलाच जोर पकडला आहे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला घरचा आहेर दिला आहे, तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे, सोबतच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे, असं वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले सत्तार?
भाजपचे लोक खडखड करत आहेत, त्यांच्यासाठी मी म्हणालो की आम्ही मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो कारण मी गुवाहाटीला गेलो बिर्याणी खाल्ली आणि मुख्यमंत्री बदलला. एका शेतकऱ्याच्या मुलाला मी मुख्यमंत्री केलं, मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे. मी हिंदुत्ववादी असलेल्या एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केलं, एमआयएमचा मुख्यमंत्री केला नाही. आम्ही बंड केलं नसतं तर भाजपचे लोक सत्तेत आले असते का? आणि पुढचे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदेच होणार असं सत्तार यांनी म्हटलं आहे.