अमरावती : अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केल्याने प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. प्रवीण तायडे यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बहिरम येथे आमदार प्रवीण तायडे यांचे फलक दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी फाडून टाकले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्वागत सभेत बोलताना प्रवीण तायडे यांची जीभ घसरली. त्यांनी बच्चू कडू यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत त्यांना शिवीगाळ केली आणि माझ्या वाटेला जाऊ नका, तुमचे किती कार्यकर्ते आहेत, ते घेऊन या. जागा आणि वेळ ठरवा, मी कुठेही येण्यास तयार आहे, अशा शब्दात आव्हानही दिले. त्यांच्या या भाषणाची ध्वनिचित्रफीत प्रसारीत झाल्यानंतर प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाले……..