रोहित, विराटचे भवितव्य निवड समितीच्या हाती; भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचे मत

0
4

ऑस्ट्रेलियातील मालिका पराभवात फलंदाजांचे आणि त्यातही रोहित शर्मा, विराट कोहली या प्रमुख खेळाडूंचे अपयश कारणीभूत होते. या दोघांचेही भवितव्य आता पूर्णपणे निवड समितीच्या हातात आहे, असे मत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.ऑस्ट्रेलिायात जाण्यापूर्वी सर्व फलंदाज चांगल्या लयीत होते असे नाही. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेतही फलंदाजांचे अपयश संघाला भोवले होते……… ऑस्ट्रेलियातील पराभवापेक्षा मायदेशात न्यूझीलंडच्या फिरकीसमोर भारताने तीनही कसोटी सामने हरणे ही सर्वात नामुष्कीची गोष्ट होती. तेव्हाही रोहित, विराट लयीत नव्हते. अशा वेळी भारतीय संघाचे दरवाजे ठोठावणाऱ्या खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळणार नसेल आणि वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याचे धाडस नसेल, तर अशी निवड समिती काय कामाची आहे,’’ असा संतप्त प्रश्न सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला आहे…………..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here