व्लादिमीर पुतिन यांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला रशियाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून सत्ता ग्रहण केली तेव्हा हा माजी गुप्तहेर अनेकांसाठी एक गूढच होता.
त्याच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास हे लक्षात येते की रशियाच्या या करिष्माई नेत्याने आपल्या बालपणातील कठीण दिवसांतून क्रेमलिन म्हणजे राष्ट्रपती कार्यालयापर्यंत मजल मारली आणि सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये कसे सामर्थ्यवान बनले.
31 डिसेंबर 1999 रोजी रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अचानक राजीनामा जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
व्यापक भ्रष्टाचार आणि असंख्य राजकीय आणि सामाजिक समस्यांमुळे बोरिस येल्तसिनचे अध्यक्षपद झपाट्याने लोकप्रियता गमावत होते आणि ते अप्रत्याशित झाले होते.