: शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही काका पुतण्यांमध्ये फूट पडली आहे हे महाराष्ट्राला जुलै २०२३ पासून माहीत आहेच. बारामती या मतदारसंघातून दोघंही नेतृत्व करतात. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे निवडून आल्या आणि खासदार झाल्या. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे युगेंद्र पवारांच्या विरोधात निवडून आले आणि आमदार तसंच उपमुख्यमंत्री झाले. पवार विरुद्ध पवार असा सामना दोन्ही निवडणुकांमध्ये दिसला. आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठूरायाला दोन्ही पवार एकत्र येऊ दे असं साकडं घातलं आहे.