सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्याकडे मराठी कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर सिद्धार्थ-मितालीने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. ही रोमँटिक जोडी ऑनस्क्रीन एकत्र केव्हा झळकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर नव्या वर्षात या दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी देत त्यांच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे……..
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा कौटुंबिक टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना आणि टीझरला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ‘यल्लो यल्लो’ गाण्यावर दाभाडे कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला असून हे गाणं सोशल मीडियावर, लग्नात प्रचंड गाजत आहे. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिश दुधाडे, राजन भिसे, आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत……….