हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी नक्षली ठरवण्याचा प्रयत्न – एनएसयूआय

0
21

नागपूर : शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, सरकारी नोकऱ्यातील आरक्षण यासाठी सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी नक्षली ठरवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे (एनएसयूआय) राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
एनएसयुआयची राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळा सेवाग्राम येथे पार पडली. त्यानंतर चौधरी यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला…..

चौधरी म्हणाले, केंद्र सरकारने शिक्षणातून आरक्षण संपविण्याची सुरुवात केली आहे. २०१३ मध्ये सार्वजनिक क्षेत्रात १३ लाख नोकऱ्या होत्या. २०२३ पर्यंत त्या साडेआठ लाख राहिल्या आहेत. देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये फक्त दहा टक्केच शिक्षक व प्राध्यापक हे एससी, एसटी व ओबीसीचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती व शिष्यवृत्ती अडविली जात आहे. या विरोधात आवाज उठविणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी एनएसयूआयचे महाराष्ट्र प्रभारी अक्षय क्रांतिवीर, अर्जुन छापराणा उपस्थित होते. सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात एनएसयूआयतर्फे आजपासून देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here