अकोला : आठ दिवस रेल्वे फाटक बंद, नागरिकांना मनस्ताप

0
76

अकोला : शहरातील न्यू तापडिया नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील फाटक रेल्वे मार्गाची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आठ दिवस बंद ठेवण्यात आले. त्यामुळे हजारो नागरिकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. मोठा फेरा घेऊन नागरिकांना शहर गाठावे लागते. मध्य रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील फाटक क्र. ३८ ए हे १ जानेवारीला सकाळी ६ वाजतापासून रेल्वे मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी बंद केले. हे फाटक ८ जानेवारीला रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. मध्य रेल्वेने तब्बल आठ दिवस रेल्वे फाटक बंद ठेऊन परिसरातील नागरिकांना चांगलेच वेठीस धरले आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेकडून मार्गाची देखभाल व दुरुस्तीचे कार्य रात्रीच्या सुमारास वाहतूक बंद ठेऊन केले जात होते. या वेळेस प्रथमच संपूर्ण आठ दिवस २४ तास वाहतूक बंद केली. याठिकाणी दिवसा रेल्वे मार्गाचे काम सुरू ठेऊन रात्री ते बंद ठेवण्यात येते. वास्तविक रात्री काम करून दिवसा फाटक वाहतुकीसाठी सुरू ठेवता आले असते. मात्र, मध्य रेल्वेने नागरिकांच्या गैरसोयीचा विचार न करता थेट आठ दिवसांसाठी रेल्वे फाटक बंद ठेवण्याचा मनमानी निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here