Sanjay Raut : भाजपाचं अधिवेशन शिर्डीमध्ये पार पडलं. या अधिवेशनात अमित शाह यांनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेबाबत संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान अमित शाह यांनी केला आहे असं राऊत म्हणाले आहेत.
अमित शाह नेमकं काय म्हणाले होते?
महाराष्ट्राच्या विजयाचे अनेक अर्थ आहेत. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते २० फूट गाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं.