शुन्याऐवजी इंग्रजीतला ‘o’ मारला..एका चुकीनं सोयाबीनची रक्कम अडकली, शेकडो शेतकऱ्यांवर नामुष्की

0
56

Soybean Farmer: गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या रकमेवरून वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलंय. सोयाबीनच्या खरेदी केंद्रात बँक खात्यात माहिती टाकताना शुन्याऐवजी इंग्रजीतील O टाकले गेल्यानं सोयाबीनची रक्कमच खात्यात जमा झाली नाही.

अकोल्यातील वाडेगावच्या नाफेड खरेदी केंद्रात हा प्रकार घडला आहे. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी बुलढाण्यातही घडला होता. संबंधित कार्यालयातील चुकीमुळे शेतकऱ्यांना आता वारंवार पैशासाठी चकरा मारण्याची नामुष्की ओढावली आहे. माहिती भरताना झालेल्या एका चुकीनं हजारोंची रक्कम रखडली आहे. अकोल्यातील बाळापुरात 27 शेतकऱ्यांना या चुकीचा फटका बसलाय.

नाफेडकडून वाडेगावच्या केंद्रात सोयाबीन खरेदी सुरु करण्यात आली होती. याकरता शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून बँक पासबुकची झेरॉक्स व इतर कागदपत्रे जमा केल्यानंतरही माहिती भरताना चूक झाल्याने हा प्रकार घडलाय. शेतकऱ्यांना आता त्यांच्याच पैशांसाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.यावर अधिकारीही टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

ऑनलाईन नोंदणीसाठी कागदपत्रं आणून दिल्यानंतरही माहिती भरताना चूका झाल्याने शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यास दिरंगाई होत आहे. यावर मुंबईच्या नाफेड कार्यालयातून पैसे मिळतील असं मोघम उत्तर देत अधिकारी टोलवाटोलवी करत असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी उशीर होत असल्याची ओरड होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here