चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई

0
73

चंद्रपूर: नायलॉन विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील ३४ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांना १३ ते १५ जानेवारी असे तीन दिवस हद्दपार केले आहे. मांजा विक्री प्रकरणात हद्दपारीची ही संपूर्ण राज्यातील पहिलीच कारवाई आहे.

प्लास्टिक व इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याच्या सणाच्या वेळी करतात. त्यामुळे पक्ष्यांना व मानवी जीवितास तीव्र ईजा होते. अशा धाग्यांवर शासनाने बंदी घातलेली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी पर्यावरण पुरक धाग्याच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात अधिसूचना निर्गमित करून तसेच अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यप्रणाली तयार करून चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस ठाणे स्तरावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच सदर नायलॉन मांजावर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथक तयार करून धाडी घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अशा धाग्यांवर बंदी घालण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here