PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला

0
73

PM Narendra Modi मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई व नवी मुंबईत दौऱ्यावर असून ते यावेळी विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. दरम्यान महायुतीला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

अशातच यावेळी पंतप्रधान मोदी हे  महायुतीच्या आमदारांशी बैठकीत संवाद साधणार आहेत. मोदी यांच्या हस्ते ‘आयएनएस सूरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे सकाळी जलावतरण झाले. त्यानंतर नेवीच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान संवाद साधला असून यावेळी मोदींनी महायुतीच्या आमदारांना खास सल्ला देत मार्गदर्शन केलं आहे.

मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात राज ठाकरेंचा (Raj Thackeray)  खास उल्लेख केला आहे. राज ठाकरेंनी जसा 2011 ला गुजरात ज्याप्रमाणे गुजरात दौरा केला होता. तसेच अभ्यास दौरे इतर आमदारांनी ही केले पाहिजेत, अशी सल्लाही मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला आहे.  

राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचा खास उल्लेख

मोदींच्या मार्गदर्शनात आमदारांनी प्रामुख्याने लोकांमध्ये जायला हवे, विरोधकांशी ही श्रेय वादातून टिका करण्यापेक्षा कामातून उत्तर द्या.तुम्ही केलेल्या कामावर लोकांची काय मत आहेत हे जाणून घ्या,  इतर राज्यात किंवा इतर मतदारसंघाच एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यास दौरा करा, अशी शिकवणी ही पंतप्रधानांनी महायुतीच्या आमदारांना दिली आहे. मात्र यावेळी मोदींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरात दौर्‍यावर आले होते, त्याचं आवर्जून उदाहरण देत उपस्थित आमदारांना त्यांच्या प्रमाणे अभ्यास दौरा करण्याचा सल्ला दिला आहे. समाजासोबत,  कुटुंबालाही वेळ द्या, आपल्या कामांचा एक संकल्प करून ती काम कशी पूर्ण करता येतील याचं नियोजनही असायला हवे.असेही मोदी यावेळी म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here