मुर्तिजापूर:-सामान्य नागरिकांचे दैनदिन जीवन सुकर व्हावे याकरीता जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेले सात कलमी कार्यक्रम राबविणार येणार असल्याची महिती अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली. याबाबत गुरुवारी तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली .राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात पुढील 100 दिवस सात कलमी कार्यक्रम राबविला जाणार असल्याने त्याच्या पूर्वनियोजनार्थ मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात जिल्ह्याधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी बी. वैष्णवी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सर्व शासकीय विभागाच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत पुढील 100 दिवस तालुक्यात प्रत्येक विभागाच्या वतीने विविध कार्य करावयाचे असून या करिता पूर्व नियोजन करून कुठल्याही नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याची खबदारी त्या-त्या कार्यालयाच्या प्रमुखांनी घ्यावयाची आहे. या करिता आत्ताच्या क्षणा पासूनच सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार व जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी बी. वैष्णवी यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख व उपविभागीय अधिकारी कार्यालयाची कसून तपासनी केली.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा मूर्तिजापूर येथे नियोजित दौरा होणार असल्याने तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सतर्क होते. तर तहसील कार्यालयातील परिसरात अवैध्यरित्या नो पार्किंग करण्याऱ्या वाहन धारकांवर मूर्तिजापूर शहर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. मात्र चक्क तहसीलदार यांच्या दालनाच्याच बाजूला असलेल्या आवरात असलेल्या विविध कार्यालया समोर येथील कर्मचार्यांनी अवैधरीत्या आपल्या दूचाकी पार्क केल्याने कायदा हा केवळ सर्वसामान्य नागरिकांकरताच का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून विचारण्यात आलाय.
अशा प्रकारे तहसीलदार महोदयांच्या दालना लगत आलेल्या परिसरात अवैद्य वाहन पार्क करणारया कर्मचार्यांवर कारवाई होईल का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच जिल्हाधिकारी मूर्तिजापूर येथे येणार असल्याने सर्वात शासकीय कार्यालय साप व स्वच्छ करण्यात आली आणि कार्यालय गोंधळ होऊ नये म्हणून नागरिकांना सुद्धा कार्यालयामध्ये प्रवेश दिला नाही त्यामुळे बहुतांश लोकांचे कामे गुरुवारी कोळंबली होती यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, तहसीलदार शिल्पा बोबडे, गटविकास अधिकारी अशोक बांगर, लक्ष्मी देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर कराव्ळे पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर डी. नवालकर, नगर परिषदेचे राजेश भुगुल यांच्या सह इतर शासकीय विभागाचे अधिकारी वर्ग तथा कर्मचारी उपस्थित होते.