Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव…; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!

0
71

Girish Mahajan : राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Minister List) जाहीर करण्यात आली. मात्र, यात रायगडमधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) आणि रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केल्याने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय अवघ्या एका दिवसात स्थगित करण्यात आला. यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. आता या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

आज शनिवारी (दि. 25) त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजा पार पडली. दरवर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते ही शासकीय पूजा पार पडते. मात्र यंदा नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती असल्याने गिरीश महाजन यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. शासकीय पूजेनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला आज दुसऱ्यांदा योग आला. काल अमितभाई यांच्यासोबत इथे आलो होतो. आज पुन्हा पूजेसाठी आलो. मी चौथ्यांदा इथे पूजा केली. कुंभमेळा मंत्री म्हणून माझं नाव घोषित झाले आहे. आपण सुरक्षित कुंभमेळा करू, आम्ही तयारीला सुरुवात केली आहे, असे त्यांनी म्हटले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here