जिजाऊ जयंती राष्ट्रीय सण होणे ऊर्जावान समाजासाठी आवश्यक
:अनंतराव गुढे माजी खासदार:
अमरावती विद्यापीठात जिजाऊ विचार अध्यासन केन्द्र सुरू करावे
:रामेश्वर अभ्यंकर:
जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य कार्यालयात जिजाऊ जयंती आणि विवेकानंद जयंती चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य स्मिता देशमुख ख्यातनाम जिजाऊ चित्रपटाच्या अभिनेत्री यांनी सुराज्य व स्वातंत्राचे स्वप्न कसं पहावं हे माँ साहेब जिजाऊंनी मरगळ आलेल्या समाजाला कम्फोर्ट झोन मधुन बाहेर काढुन स्वराज्य निर्मिती केलीअसे असे प्रतीपादन केले
कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रमुख अतीथी मा अनंतराव गुढे माजी खासदार व मुख्य वक्त्या स्मिता देशमुख प्राचार्या मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती तथा अभिनेत्री जिजाऊ चित्रपट तथा बँक अध्यक्ष अविनाश कोठाळे, व ऊपाध्यक्ष प्रमोद चौधरी तथा संचालक यांनी माॅ जिजाऊंच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतीमेला पुष्पांजली आणि दिपप्रज्वलनाने झाली.
याप्रसंगी प्रमुख अतीथी माजी खासदार अनंतराव गुढे,प्राचार्या स्मिता देशमुख,अतीथी रामेश्वर अभ्यंकर यांचे स्वागत व सत्कार शाल,श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन बँकेतर्फे करण्यात आले.
प्रास्तविकात अविनाश कोठाळे यांनी बँकेचे सन 2025 हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने विदर्भात सहकारी चळवळ अधिक मजबुत होण्यासाठी व अमरावती,अकोला,यवतमाळ,नागपुर आणि तालुका स्तरावरिल चांदुरबाजार,परतवाडा,दर्यापुर या तालुका स्तरातील शाखांमधुन युवक युवतींना विविध 200प्रकारच्या चांगल्या ऊद्योगांसाठी कर्ज देऊन युवक,शेतकरी स्वयंरोजगार ऊद्योग निर्मीतीसाठी ऊभे करणे हा ऊद्देश ऊद्योग वर्षाचा असल्याचे सांगितले.युवकांना 25लक्ष पर्यंतचे कर्ज 7दिवसात देण्यात येते तर प्रती व्यक्तीला 3.75कोटी पर्यंत,समुह कर्जाकरीता 7.45कोटी पर्यंत कर्ज देण्यात येते.जिजाऊ बँक विदर्भातील एक अग्रगण्य बँक असुन बँकेच्या ठेवी 433कोटी,कर्ज 282कोटी तर बँक गुंतवणुक 160कोटी असुन ,नक्त अनुत्पादक कर्ज 2.89% आरबी आय मापदंडानुसार बँक मार्च 2024,ला फायनान्सीयल साऊंड वेल मेनेज असल्याचे सांगितले व युवक व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात ऊद्योग कर्जासाठी जिजाऊ बँकेत यावे असे आवाहन केले.तसेच विवेकानंद जयंती या दिवसाला युवा दिन संबोधत असल्याने युवकांनी स्वत:वर स्वत:चा विश्वास ठेऊन ऊद्योग ऊभारावे॓असे आवाहन केले.
मा.अनंतराव गुढे माजी खासदार यांनी सांगितले की,माॅ जिजाऊंच्या काळात कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसतांना त्यांना 76वर्षाचे सुदृढ जिजाऊंना आयुष्य लाभले व माँ जिजाऊ साहेबांची जगण्याची प्रेरणा लोक कल्याणकारी राज्य निर्मिती हीच होती.छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या गुरू होत्या व छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्माण करतांना संगटाच्या प्रसंगी सकारात्मकतेने मुकाबला करण्याचे मार्गदर्शन व धैर्याचे धडे त्यांनी दिले.आधुनिक काळातील स्त्री शक्तींचे मार्गदर्शन मा जिजाऊं प्रमाणे लाभल्यास सुराज्य निर्मिती व महीला सक्षम होईल असा आशावाद त्यांनी वक्त केला.जिजाऊंचे विचार हे निरंतर प्रेरणादाई असल्याने जिजाऊ जयंती हा राष्ट्रीय सन स
होणे ऊर्जित समाज निर्मितीसाठी आवश्यक व सर्व राज्यांमधे मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे अशी मांडणी त्यांनी केली.जिजाऊ बँकेची नेत्रदिपक प्रगती समाजामधे स्वत:खासदार असतांना प्रत्यक्ष पाहीली,जिजाऊ बँकेने नागरीकांमधे विश्वासाःर्हता निर्माण केली व ईजी.अविनाश कोठाळे यांचे नेत्रुत्वात सर्व संचालकांना सोबत घेऊन बँकेचे शिस्तप्रिय काम व सहकारातुन सामान्यांतला सामान्य माणुस सहकार व आर्थिक सहकार्याने ऊद्योगात ऊभा झाला पाहिजे ही बँकेची भुमिका ऊत्कृष्ठ असल्याचे प्रतीपादन केले.
याप्रसंगी मुख्य वक्त्या स्मिता देशमुख यांनी
नि:सत्व आणि मुर्दाड मनावर स्वराज्य विचारांचा सिंचन करणाऱ्या जिजाऊ माँ साहेबांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेताना आज वर्तमानामध्ये जिजाऊं माँ साहेबांच्या विचारांना कसे अंगी करावे याचे विवेचन केले. इतिहास माणसाला घडवतो असं म्हणतात पण ज्यांनी इतिहास घडविला त्यांची आजही समाजाशी नाळ जुळलेली आहे अशा राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे पुन:स्मरण करण्याचा हा दिवस सर्वांसाठी खूप आनंदाचा आहे! आधुनिक समाजामधील आजचे प्रश्न सोडवितांना इतिहासाची सांगड घातल्यास ,भौतिकवादाच्या आदर्शवादाच्या संकल्पना सांगतांना सर्व सुख असतांना समाजामध्ये अस्वस्थपणा का जाणवतो? मानसिक तणावासोबत समाजाच्या ऊत्कर्षासाठी बाधा आणणार्या नकारात्मक बाजु मोडीत काढणार्या जिजाऊ माँ साहेब यांच्या दृष्टिकोनातून समाजाकडे पाहिलं तर अनेक प्रश्नांची उकल होते .दैनंदिन सुधारणा आपल्या मानसिकतेवर विचारावर सद्विवेकावर अवलंबून असते. शांततेने विचार केला तर समाजात शांती, समाधान, सुख नाही कारण त्यांच्या व्याख्या आज बदलल्या आहेत. पारतंत्र्यात असलेली घुसमट माँ साहेबांना दिसली आणि ती दूर करण्यासाठी एक संघ समाज निर्मितीसाठी, वर्तनणुकीतून त्यांनी भूमिका मांडली. सन्मानाने सहकार्याने समाजनिर्मिती,रोजगार निर्मिती, नेत्तृत्वगुणसंपन्नता येण्यासाठी कार्य केले. समाजकारण, राजकारण, पर्यावरण इतिहासाबद्दल जाण दिली. सज्जनांचे रक्षण दुर्जनांचे निर्दालन करावं असं वाटल्याने महिलांनी स्वतःचे रक्षण करावे ही शिकवण दिली. सर्वधर्माचा अभ्यास करून सर्वधर्म सन्मान शिकविला. मुलीच्या जन्माचे स्वागत केले. शिवरायांवर संस्कार करताना स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याच्या संकल्पना समजावून सांगितल्या. मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करण्याची मानसिकता रयतेमध्ये निर्माण करणारी जिजाऊ समजून घेताना समाज समस्येचे निराकरण करण्यासाठी समाज वाचणे गरजेचे आहे असे सांगितले. पारतंत्र्यात समाजाला मरणाची अवकळा आली असतांना कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्यासाठी मुलांना ऊन, वारा, पाऊस हे नैसर्गिक चटके सोसू दिले तर मुले कसल्याही परिस्थितीमध्ये जिजाऊ समजून घेऊन वर्तमान सकारात्मकतेने भावनिक दृष्ट्या सक्षम होईल असे अपेक्षा व्यक्त केली. पती-पत्नी मधील दुर्दम्यविश्वास जिजाऊ चरित्रात दिसतो. स्वप्न कसं पहावं मा साहेबांनी शिकविल. आज वर्तमानपत्र प्रसार माध्यमातील बातम्या पाहिल्यावर जाणवते की तेव्हा काहीच नसतं तेव्हा जगण्याची मजा काही औरच असते आणि म्हणून जिजाऊंचा अभ्यास प्रत्येक घरात झाल्यास समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
अतिथी रामेश्वर अभ्यंकर काँग्रेस नेते यांनी विवेकानंद व जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व अमरावती
विद्यापीठामधे जिजाऊ विचार तथाअध्यासन केन्द्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली.
कार्यक्रमाचे संचालन अर्चना बारबुदे प्रशासन अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ पल्लवी बारब्दे संचालिका यांनी केले.कार्यक्रमाला प्रामुख्याने बँकेचे ऊपाध्यक्ष चौधरी,सुरेखाताई लुंगारे,संचालक सर्वश्री विजय जाधव,बबन आवारे,नितीन डहाके,श्रीकांत टेकाडे,स्वप्निल वावरे,सुनिल चाफले,अनिल टाले,सुरेन्द्र दाळु,अरविंद गावंडे,प्रशांत गावंडे,भैय्यासाहेब निचळ,अनिल बुरघाटे,अनिल बंड तसेच सुभाष जाधव,अविनाश पेठे,प्रल्हादराव कोहळे,वानखेडे,ईजी.गणेश बारब्दे,ईजी भरत विघे,ईजी बारबुद्धे,
,दीलीप डेहनकर ,प्रा धोपटे ,गायधनी,तिडके,तथा असंख्य सभासद व सर्व शाखांचे व्यवस्थापक,कर्मचारी वृंद ईत्यादी हजर होते.कार्यक्रम यशस्वीतेकरीता सागर राऊत,पवन कडु,प्रेरणा बामणे,भारती लामसे,गणेश कडू,निलेश मोहोड,गोपाल कडु,वैकुंठ साळुंके यांनी विशेष परीश्रम घेतले.काय्रक्रमाची सुरूवात जिजाऊ वंदनेने तर राष्ट्रगीताने सांगता झाली.