WTC Points Table: पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवानंतर अजून एक धक्का, WTC गुणतालिकेत पहिल्यांदाच…

0
53

World Test Championship Points Table: पाकिस्तान सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत आहे. पण पाकिस्तानला घरच्या मैदानावरील सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीसाठी फिरकीपटूंना अनुकूल अशी खेळपट्टी तयार केली. पण मुलतानच्या याच खेळपट्टीवर पाकिस्तानचा वेस्ट इंडिजने पराभव केला. वेस्ट इंडिजने पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर ३५ वर्षांनी विजय मिळवला आहे.

आता पाकिस्तान क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची शेवटची कसोटी गमावल्यानंतर संघाला अखेरच्या स्थानावरून समाधान मानावे लागले आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अखेरच्या स्थानी राहिला आहे.

आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या चक्रातफक्त दोन सामने शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ लवकरच श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ आधीच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला असला तरी श्रीलंकेचा संघ मात्र बाहेर पडला आहे. जर ऑस्ट्रेलियाने ही मालिका जिंकली, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी असेल. जिथे सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here