Supriya Sule on Ajit Pawar : पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बाबुराव चांदेरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेप्रकरणी शंकर जाधव यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला होता. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास सुसगाव येथे आरोपी बाबुराव चांदेरे हे पोकलेन लावून खोदकाम करत होते. तेव्हा, तक्रादार प्रशांत जाधव यांनी तिथे येऊन विचारपूस केली. यावरून बाबुराव चांदेरे यांनी “तू कोण विचारणारा” असं म्हणून त्यांच्या कानशिलात लगावली. तसेच इतर एका व्यक्तीला धक्काबुक्की करत सोबत असलेल्या व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.