मी चहापाण्याला बसलो होतो, आरोपी अन् एपीआयचं बिल मीच दिलं, धनंजय देशमुखांचा CCTV वरून गौप्यस्फोट, म्हणाले..

0
108

Dhananjay Deshmukh: मनोज जरांगे यांचा उपोषण आंदोलनाला धनंजय देशमुख यांनी एक दिवसाचे उपोषण करत पाठिंबा दिल्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 50 दिवस उलटले असून कुटुंबाच्या वेदना कायम असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले .पोलिसांच्या तपासावर समाधानही त्यांनी व्यक्त केले .दरम्यान या प्रकरणात सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजवर धनंजय देशमुख यांनी महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय.

मी माझ्या मित्रांसोबत चहापानासाठी बसलो होतो .त्या ठिकाणी आरोपी आणि एपीआय आले .माझी आणि आरोपीची चर्चा झाली नाही .चहा पिल्यावर मी बिल दिले .मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत . काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते . बीड शहर पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांना बालाजी तांदळे यांनी धमकवल्याचा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता त्याच संदर्भातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते .

काय म्हणाले धनंजय देशमुख ?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकीकडे वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .कृष्णा आंधळेला वांटेड घोषित करण्यात आले आहे .या संपूर्ण प्रकरणानंतर दररोज नवनवे पुरावे तपास यंत्रणांना सापडत असून काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सीसीटीव्हीवर धनंजय देशमुख बोलले आहेत . ते म्हणाले,’मी माझ्या मित्रांसोबत चहापानासाठी बसलो होतो.त्या ठिकाणी आरोपी आणि एपीआय आले.माझी आणि आरोपीची चर्चा त्या ठिकाणी झाली नाही.चहा पिऊन झाल्यावर मी बिल दिले.मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो.आरोपींनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले.आपण मात्र चांगुलपणा केला होता.पण आरोपींनी घात केला.माझ्याकडे आलेल्या लोकांसाठी अतिथी देवो भवचा बोर्ड लावला आहे. कुणीतरी बाहेरच असलं तरी त्याला पाहून चार कासंरण आपलं काम आहे या भावनेतून मी साहेबांसाठी बिल दिले .असं धनंजय देशमुख म्हणाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here