जिजाऊ बँकेत सुभाषचंद्र बोस जयंती निमीत्य युवकांसाठी ऊद्योग सहायता केन्द्र निर्मिती केल्यास रौप्य महोत्सव वर्षात अधिक ऊद्योजक निर्माण होतील!डाॅ.व्ही टी ईंगोले.वैज्ञानिक

0
68

जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेत देशभक्त सुभाष चंद्र बोस जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात डॉक्टर विजय ऊपाख्य व्हि.टी. इंगोले वैज्ञानिक यांनी जिजाऊ कमर्शियल को_ऑपरेटीव्ह बँकेने यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी उद्योग सहायता केंद्र निर्माण केले पाहिजे आणि त्याद्वारे विविध उद्योजकां साठी संपूर्ण कौन्सेलींग तथा मार्गदर्शन केल्यास यशस्वी उद्योजक निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यांच्या प्रदिर्घ अभियांत्रीकी ज्ञानातुन व ईसीई सारखा अमरावतीमधे सोरऊर्जा पॅनल निर्मितीचा प्रकल्पच नव्हे तर मुंबई, पुणे,नाशिक परीसरात असंख्य ऊद्योगांना चालना मिळाली असुन त्यांच्या प्रेरणेने असंख्य आधुनिक ऊद्योजक तयार होत असुन नि:शुल्क ते जिजाऊ बँकेच्या ऊद्योजक निर्मितीच्या योजनेत मार्गदर्शन करतील असे आवर्जुन कथन केले.याप्रसंगी त्यांनी अभियांत्रीकीच नव्हे तर सर्वच ऊद्योगाबाबत मार्गदर्शन करतील याकरीता युवकांनी सकारत्मता व नव निर्मितीचा ध्यास बाळगुन अमरावती मधे आय टी पार्क निर्मीतीसाठी चांगली संधी असल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला प्रमुख अतिथी डाॅ.व्हि.टी इंगोले व माजी अधीक्षक अभियंता शरद तायडे यांचे शुभहस्ते देशगौरव सुभाषचंद्र बोस व राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पन आणि दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या आयुष्यातील घटनां विषद करतांना केवळ सहा महिण्यात अभ्यास करुन आयसीएस झालेल्या सुभाषबाबुंची जिद्द स्पर्धा परिक्षा देणार्या नवयुवकांसाठी अनुकरणीय असुन आई वडीलांची ईच्छापुर्तीचे मुर्तीमंत ऊदाहरण आहे.ICS ऊत्तीर्णझाल्यानंतर दिलेला राजीनामा ब्रिटीश सरकारने गंभीर नोंद घेऊन त्यांच्या प्रत्येक कृतीवर पाळत ठेऊन देखील ते नजरकैदेत असतांना देशातुन पसार झाले ही कृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या औरंगजेबाच्या नजरकैदेतुन निसटण्याचे स्मृती जागृत करते व शिवाजी महारांजांबद्दल त्यांची प्रचंड आस्था दर्शवते. राष्ट्रप्रेमाणे ओतप्रोत भरलेले त्यांच्या आयुष्याचा जर्मनीतील हिटलरला बुद्धमुर्तीची भेट देणे आणि,
जापानच्या मदतीने हिन्दुस्थान आसामचा दिसपुर भाग आझाद हिंद सेनेच्या मार्गक्रमाने स्वतंत्र करणे हे साहसपुर्ण आयुष्य युवकांना राष्ट्रासाठी जगायचे कसे हे दर्शविते तर गांधीजींना स्वातंर्य मिळविण्यासाठी नियोजन काय आहे हे विचारण्याचे धाडस आणि गांधीजींबाबतच्या आदरामुळे 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभागी होण्याचे युवकांना जापानमधुन केलेले आवाहन आणि भारताची पुनर्बांधणी हे पुस्तक सर विश्वैशरय्या यांचेशी सल्लामसलत करूण लिहीणे हा व्यासंग नवयुवकांना प्रेरणादेणारा असल्याचे अविनाश कोठाळे यांनी सांगितले.नवयुवकांना स्वयंऊद्योगास प्रवृत्त करणे हाच जिजाऊ बँकेच्या संचालक मंडळाचा रौप्यमहोत्सवी ऊद्योग वर्षात असल्याचे प्रतीपादन अध्यक्षांनी केले.याप्रसंगी ईजी.शरद तायडे यांनी जिजाऊ बँकेच्या 5लक्षापासुन ते 3.50कोटी वैयक्तिक कर्जाच्या आर्थिक सहाय्याने स्वत:ला ऊद्योजक व ऊद्यमशिल करावे आणि जिल्हा ऊद्योगाच्या 25%सबसीडीच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.बँकेचे ऊपाध्यक्ष ईजी.प्रदीप चौधरी ऊपाध्यक्ष यांनी जिजाऊ बँक सदैव युवकांसोबत तद्वतच ठेवीदारांच्या संरक्षणार्थ बँकीग व्यवसाय करीत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सेवानिवृत्त अभियंता संस्थेचे ईजी.विद्याधर ईंगोले,बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे संगणक तज्ञ सुरेन्द्र दाळु,सीईओ नितीन वानखडे,ऊप मुकाअधिकारी हरीष नाशिरकर,बँक आयटी टीमचे श्रीकांत काळे,प्रशांत बारबुदे,ईजी.पवित्रकार,श्रीकांत दाळु,सौ.किरण दिवान,सौ.वैशाली पुंड,चैताली ठाकरे,
सौ.कोंडे,वैकुंठ साळुंखे,अर्चना बारबुदे,मंजुशा वैद्य,विनय तिडके,श्री.मेटे,श्री कडु,हर्षल भाले व्यवस्थापक महल्ले,विजय ढोबे ईत्यादी हजर होते तर संचालन व आभार सौ. नम्रता ईंगोले यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेकरीता स्नेहल वसु, गणेश कडू,ठाकरे ,गणेश धाकतोड यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here