छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसाच्या शोपासूनच चित्रपटाला तुफान गर्दी होते आहे. छावा हा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारलेला आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर लक्ष्मण उतेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. समीक्षकांनीही सिनेमाचं कौतुक केलं आहे. दरम्यान या सिनेमातला डिलीट करण्यात आलेला सीन आता व्हायरल झाला आहे.