आ. हरिष पिंपळे यांच्या हस्ते लोकार्पण .
मुर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर पूर्णा नदी तीरावर असलेले पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे वर्षभर श्री लक्षेश्वर संस्थान व पुर्णा नदी तीरावर होणाऱ्या कार्यक्रमाला भाविकांची प्रचंड गर्दी असते .यामध्ये कावळ यात्रा , 3 दिवस गणेश मुर्ती विसर्जन , 3 दिवस देवी मुर्ती विसर्जन , वर्षभरात 2 ते 3 वेळा सोमवती यात्रा, महाशिवरात्री महोत्सव निमित्त भाविकांची मोठी गर्दी होते.
भाविकांची गरज ओळखून श्री लक्षेश्वर संस्थानचे परम भक्त चतुर परिवाराने स्व. अनंतभाऊ प्रभाकरराव चतुर यांच्या स्मृति प्रीत्यर्थ पाणी टँकर श्री लक्षेश्वर संस्थानला दान दिला .
महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर ह. भ. प. तुळशीदासजी धर्माळकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मा. आ. हरिष पिंपळे यांच्या हस्ते पाणी टँकरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी चतुर परिवारातील आशिष चतुर नागपूर , प्रा . जयंत चतुर यवतमाळ , यशवंत चतुर अमरावती , पंकज चतुर मुर्तिजापूर यांच्यासह हजारो शिवभक्त उपस्थित होते.
सर्वांनी चतुर परिवाराचे आभार मानले .