न्यू खेतान नगर कौलखेड अकोला येथील शाळा संचालिका पल्लवी कुळकर्णी

0
5

अकोला. न्यू खेतान नगर कौलखेड अकोला येथील शाळा संचालिका पल्लवी कुळकर्णी. यांच्या रेणुका प्राथमिक मराठी शाळा न्यू खेतान नगर येथील तब्बल दहा चिमुकल्या मुलींवर त्याच शाळेतील नराधाम कर्मचारी. हेमंत विठ्ठल चांदुरकर . रा. सनसिटी रेसिडेन्सी मलकापूर यांनी इयत्या चौथी ते सातवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीवर शारीरिक लगट केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली असून. सुत्राचे माहिती नुसार रेणुका प्राथमिक मराठी शाळा न्यू खेतान नगर येथील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणाकरिता बाहेरगावी गेल्या असता .शाळेचे कामकाज बघण्याची जबाबदारीं कर्मचारी चांदेकर याचे कडे दिली असता.

त्या संधीचा गैर फायदा घेत त्या नराधामांणे शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल दहा चिमुकल्या मुलींनीवर लागोपाठ विनय भंग केला असता. ही गैर कृत्य केल्याची बाब काही विध्यार्थिनी कडून समोर आली असून. सदर गैर कृत्या ची तक्रार चाईल्ड हेल्पलाईन तसेच जिल्हा व महिला बालविकास अधिकारी यांचेकळे दिली असता.30 मार्च 2025 रोजी.प्राप्त तक्रारी वरून खदान पोलीस स्टेशन अकोला यांनी भारतीय न्याय संहिता कलम 74, 75,’ 8,9, एफ. एम पोस्कोचे कलम 10 तसेच बालन्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2025 चे कलम 75 अन्वये गुन्हा दाखल केला असून . आरोपी हेमंत विठ्ठल चांदेकर याला अटक करून न्यायालयीन कोठळी अकोला येथे रवानगी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here