WARDHA :पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हेलीपॅड निमिर्तीसाठी ७ कोटीची तरतुद असताना आपल्या मतलबासाठी २ हेलीपॅडवर कागदोपत्री २१ कोटी रूपयांची माती टाकणे आणि कंत्राटदारांना त्यांची बिलेही दाखल करणे आता वर्धा सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे”.
गोपनीय यंत्रणाचे कान टवकारल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने आता कार्यकारी अभियंता सतीश अंभोरेसह त्यांच्या काही सहकार्यांची या प्रकरणी वर्धा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) चौकशी सुरू केली आहे. तसेच सतीश अंभोरे यांची विभागीय चौकशी सुध्दा सुरू करण्यात आली असून वर्धा येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांची विभागीय चौकशी करित आहे. एकाचवेळी चौकशीचे दोन्ही फास गळयात अडकल्याने सतीश अंभोरे यांच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहे……..
कारण एसीबीने सतीश अंभोरे यांच्या वैद्य, अवैध संपत्ती, बँक खात्याची माहिती संकलीत केली आहे. तसेच तांत्रिक तपासा व्दारे सुध्दा सतीश अंभोरे यांच्या बेनामी कामांची माहिती एसीबीव्दारे घेण्यात येत आहे. कारण हेलीपॅड बनविण्यासाठी एकाच आरएमसीचा कंत्राट दोन कंत्राटदारांना कसा देण्यात आला, हे दोन्ही कंत्राटदारांनी बिल सादर केल्याने उघड झाले. या गंभीर प्रकरणात २१ कोटींची माती नेमकी कुठे पडली, याचा शोध एसीबी घेत आहे. गरज पडल्यास हा तपास सीबीआयकडे सुध्दा जाण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.