नवनियुक्त सीपी अरविंद चावरीया यांची पहिल्याच दिवशी भुमिका स्पष्ट. एका पोलीस अधिकाºयाच्या दृष्टीने, आपल्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्याचे असते. मात्र, त्याचबरोबर त्या कार्यक्षेत्राचा म्हणजे शहराचा आणि गुन्हेगारी वर्तुळाचा अभ्यास करून काही अतिरिक्त पावलं उचलावी लागतात. जेणेकरून पोलीसिंग अधिक परिणामकारक ठरेल. त्यामुळे सर्वप्रथम शहराचा अभ्यास करून, कायदा व सुव्यवस्थेला अग्रक्रम देत प्रभावी पोलीसिंग केलं जाईल, असा स्पष्ट इशारा अमरावतीचे नव नियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आमच्या चॅनलला दिला. पुणे येथे अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) पदावरून अमरावती सीपी म्हणून बदली झाल्यानंतर अरविंद चावरिया यांची १६ मे रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार घेतला. बुधवार २१ मे सीपी अरविंद चावरीया यांनी पोलिस आयुक्तालयात सर्व विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. सामान्य लोकांच्या तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारांवर अंकुश लावण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश सीपी चावरियांनी दिल्याने पोलिस वर्तुळातील अधिकारी, कर्मचाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. तर शहरातील गुन्हेगारी वर्तुळाची देखील चिंता वाढली असल्याचे चित्र आहे.

0
110

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here