*जिजाऊ कमर्शियल कोऑप.बँक ली.अमरावतीच्या मूख्य कार्यालयास तिवसा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश वानखडे यांनी नुकतीच भेट दिली. याप्रसंगी अमरावती शहरातील जिजाऊ बँक ही विदर्भातील अतिशय ऊत्कृष्ठ नामांकित सहकारी बँक असून बँकेचे रौप्य महोत्सवी वर्षांत रू.445/कोटी ठेवी,रू.308/_कोटी कर्ज ,आणि एक टक्याच्या आतमधे अनुत्पादक कर्ज आहे ही बाब अभिनंदनीय असल्याचे ते म्हणाले. जिजाऊ बँकेने अल्पावधीत अमरावती शहरातच नव्हे तर विदर्भातील बहुसंख्य समाजाच्या युवकांना आर्थिक संपन्न करण्यासाठी ऊद्योजक निर्मितीबाबतचे ध्येय निश्चित केले ही बाब समाजोन्नती आणि राष्ट्रनिर्मीतीसाठी ऊत्कृष्ठ असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
आयुष्यात ध्येय निश्चित केले तर यश नक्किच मिळते असे आमदार वानखडे यांनी प्रशंसोद्गारीत केले.आमदार होण्याचे स्वप्न त्यांनी2019मधे पाहीले व कामाला लागलो गाव तेथे संपर्क, युवकांची कामे,ग्रामीण समस्यांची सोडवणूक आणि ग्रामीण लोकांशी व माणसांशी सलोखा याचा परिपाक ही 2024च्या निवडणुकीत बलाढ्य व्यक्तिमत्वा विरूद्ध निवडणुकीत विजय संपादन करून यश मिळविले हा आहे तीच ध्येय सिद्धीअसल्याचे ते म्हणाले. प्रत्येक सामान्य युवकांनी ऊद्योजक होण्याचे स्वप्न आयुष्यात ठेवले आणि प्रयत्न केले तर निश्चित असंख्य युवक जिजाऊ बँकेच्या अर्थिक मदतीने ऊद्योजक होऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिजाऊ बँकेचा सभासद असून आवश्यक असतांना कर्ज ऊचल आणि कर्जाची नियमित परतफेड केल्याने आर्थिक शिस्त लागली व प्रत्येकाने आर्थिक शिस्त जोपासली पाहिजेच असेही त्यांनी सांगितले.
प्रथमतः राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पित करूण दीपप्रज्वलन केले.याप्रसंगी भारतीय युवकांचे हदयस्थानात विराजमान असलेले छावा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार राजेश वानखडे,बँकेचे संस्थापक तथा अध्यक्ष ईजी.अविनाश कोठाळे,बँक ऊपाध्यक्ष प्रदीप चौधरी अतिथी दत्ता दंडाळे मोर्शी,तज्ञ संचालक भैय्यासाहेब निचळ व चार टर् अकाऊंटं शुभम वानखडे,स्थानिक समिती सदस्य सर्वश्री ईजी.दीलीप राऊत,ऊद्योजक श्री ईश्वर वैद्य श्री प्रल्हाद कोहळे यांनी केले.याप्रसंगी बँकेचे सभासद आमदार झाल्यामुळे आमदार राजेश वानखडे यांचा बँकेतर्फ शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन बँक अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी सत्कार केला.ऊपाध्यक्ष ईजी.प्रदीप चौधरी यांनी पुस्तक भेट देऊन आमदार वानखडेंचा गौरव केला.
याप्रसंगी प्रास्ताविकामधे बँक अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी जिजाऊ बँके चे सभासद राजेश वानखडे हे विधानसभेत आमदार निवडून जाणारे तिसरे सभासद असून ही बँकेसाठी गौरवास्पद बाब असल्याचे म्हटले.यापुर्वी बँकेचे सभासद डाॅ.सुनील देशमुख आणि माजी मंत्री डाॅ.अनिल बोंडे खासदार हे सुद्धा निवडून आले ही बँकेची ऊपलब्धी असल्याचे ते म्हणाले.प्रत्येक आमदारांनां शासनाकडून 5कोटी आमदार निधी मतदार संघ विकास निधी सरकार देत असल्याने महाराष्ट्र सरकारने सहकार वृद्धींगत करण्यासाठी सहकारी बँकांमधे हा निधी जमा केल्यास या निधीवर व्याज जिजाऊ बँक देईल असे त्यांनी आश्वस्त केले.जिजाऊ बँक 2025 हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याने ऊद्योगवर्ष म्हणून रू.1लक्ष ते 25लक्षापर्यंत विविध ऊद्योगास शहरी भागात 25%आणि ग्रामीण भागात 35%सबसीडीच्या जिल्हा ऊद्योग केन्द्र, अण्णासाहेब पाटील विकास मंडळ,ओबीसी विकास मंडळाच्या शासकिय
योजनांतर्गत विविध ऊद्योगास 50वर्ष वयापर्यंत यूवकांना आणि 55वर्ष पर्य॔तच्या महिलांना कर्ज वितरीत करणार आहे.नवयूवकांनी यासंधीचा लाभ घेण्याचे आवाहन बँक अध्यक्षांनी केले.याप्रसंगी बँकेने संभाजी महाराज जयंतीनिमित्त सूवर्ण तारण कर्ज 2लक्ष पर्यंत केवळ 9%दसादशे व्याजदराने देण्याचे घोषित केले.बँकेच्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना कर्ज रकमेच्या 50% टाॅपअप कर्ज तात्काळ जिजाऊ बँक देईल असे अध्यक्ष कोठाळे यांनी सांगितले. तद्वतच रौप्य महोत्सवीवर्षात 800चे वर सीबील स्कोअर आणी ‘ए’ ग्रेड क्रेडीट रेटींग असणार्या कर्ज मागणी करणाऱ्या ग्राहकांना जिजाऊ बँक 10ते11%व्याज दराने कर्ज ऊपलब्ध करून देणार असल्याचे अध्यक्ष ईजी.अविनाश कोठाळे यांनी घोषित केले.
अमरावती जिल्हातील नागरीक व यूवकांनी रौप्य महोत्सवी वर्षांत बँकेच्या 100दिवस ठेव आणि 10वर्ष दिर्घ मूदती व विविध ठेव आणि किफायतशिर कर्ज योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन हरीष नासिरकर ऊप मूख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.कार्यक्रमास बॅंकेचे संचालक प्रा. सुनिल चाफले,प्रा.अनिल बंड लोकल समिती सदस्य सुभाष जाधव, कंत्राटदार श्रीखंडे,मूख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखडे,बँक अधिकारी अजय कडू,श्रीमती मोहोड,श्रीकांत काळे ,प्रशांत बारबुदे दाळू,व्यवस्थापक अमोल चित्रे,राजेश बंड,अविनाश चिखले,देशमुख ,विजय ढोले,सौ ठाकरे असंख्य सभासद व कर्मचारीवृंद ऊपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेकरीता गणेश कडू,ढोरे,ठाकरे श्रीमती वसु,मेटकर, ईत्यादी कर्मचारीवृंदांनी परीश्रम घेतले.
Home ताज्या बातम्या युवकांना ऊद्योगासाठी आर्थिक सहाय्य करण्याची जिजाऊ बँकेची योजना ऊत्कृष्ठ : राजेश वानखडे...