
अकोला, प्रतिनिधी : विशेष प्रतिनिधी , दि. ४ ऑगस्ट २०२५: अवैध धंद्यांना मूठमाती देण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारस आणि अकोट फाईल परिसरात अचानक छापे टाकून अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ₹६४,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.अवैध दारू विरोधात पारस येथे कारवाईगुप्त माहितीच्या आधारे बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पारस गावात तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.अंकुश बाळू तीतूर: याच्याकडून ₹२,४०० किमतीची ‘सखू संत्रा’ देशी दारू, ₹५०,००० किमतीची होंडा ॲक्टिवा आणि ₹१,००० किमतीचा मोबाईल, असा एकूण ₹५३,४०० चा मुद्देमाल जप्त.येसान खान जहागीर खान: याच्याकडून ₹२,१०० किमतीची ‘सखू संत्रा’ देशी दारू.मिलिंद नागोराव तायडे: याच्याकडून ₹४,००० किमतीची ४० लिटर गावठी दारू.अकोट फाईल येथील जुगार अड्ड्यावर छापायाच मोहिमेअंतर्गत, अकोट फाईल येथील एका जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तीन जुगारींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून ₹४,५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.अशा कारवाया सुरूच राहणारही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सपोनि गोपाल ढोले, पोहवा रवी खंडारे, अब्दुल माजिद, वसीम शेख, किशोर सोनोणे, कमलाकर सोनवणे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंद्यांना आळा बसेल आणि जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरूच राहतील, असा पोलिसांचा निर्धार आहे.