
अमरावती, दि. 5 : खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त बसस्थानकासमोरील मेळघाट हाट येथे खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ६ ते १५ ऑगस्ट या कालावधीत होईल.या महोत्सवाचे उद्घाटन ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र उपस्थित राहतील.या महोत्सवात, विकेंद्रित सोलर चरखा समूहाच्या कार्यक्रमांतर्गत लाभार्थी महिलांनी तयार केलेली दर्जेदार खादी आणि सौर खादी उत्पादने उपलब्ध असतील. तसेच, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांनी तयार केलेली विविध उत्पादने सवलतीच्या दरात नागरिकांना मिळणार आहेत. खादी महोत्सव दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील. या महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाने केले आहे.