
अमरावती, दि. 7 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे कुस्ती मॅट्स आणि तिरंदाजी साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत साहित्याचे वितरण रविवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विभागीय क्रीडा संकुलात करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, संजय खोडके, रवि राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश यावलकर आणि गजानन लवटे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, माजी खासदार नवनित राणा, राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस उपस्थित राहणार आहेत.यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.