मूर्तिजापूर (प्रतिनिधी): स्थानिक सेंट ऑन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ७ जुलै २०२५ रोजी एका संशोधनपर भेटीचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांनी येथील श्री संत गुणवंत महाराज मतिमंद निवासी विद्यालय व स्व एम एस निवासी मूकबधिर विद्यालयांना भेट दिली. या भेटीचा मुख्य उद्देश विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याचा अभ्यास करणे हा होता. विद्यार्थ्यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केलेले विविध नकाशे (charts), मॉडेल्स आणि इतर शैक्षणिक साहित्याची पाहणी केली. तसेच, त्यांनी तेथील विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या अडचणी आणि अनुभव जाणून घेतले. यावेळी, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांची कर्तृत्व व शाळेचे नियोजन व परिश्रम पाहून शिला सिस्टर (मुख्याध्यापिका सेंट ऑन्स स्कूल मूर्तिजापूर) आणि रवी गोंडकार सर यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचा सर्वात प्रभावी क्षण म्हणजे मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती मॅडम यांनी सांकेतिक भाषेमध्ये (Sign Language) राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यामुळे उपस्थित सर्व लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण झालीयाप्रसंगी, शिला सिस्टर (मुख्याध्यापिका सेंट ऑन्स स्कूल मूर्तिजापूर), रवी गोडकार सर, पुनम मॅडम, कोमल मॅडम, अनुराधा मॅडम . साक्षी उमक मॅडम.यांच्यासह सेंट ॲन स्कूल चे विद्यार्थी. तसेच आणि साठे साहेब (तालुका संघटक शिंदे गट). व संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर. संस्थेचे सचिव उमाताई खांडेकर. रिंकुताई खांडेकर, ऋषिकेश सर (मुख्याध्यापक), अस्मिता मॅडम. कोमल मॅडम. कोकाटे मॅडम. रितेश सर. कमलेश सर.मयूर सर.शिरसाट सर. टोबरे सर. शिंदे सर. इम्रान सर. वाडेकर सर. व विद्यार्थी. मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये एक भावनिक आणि शैक्षणिक पूल तयार झाला, त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांनी आलेल्या सेंट ऑन्स स्कूल च्या कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वांचे आभार मानले.