
मूर्तीजापूर: आज, दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी मूर्तीजापूर शहराचे सुपुत्र डॉ. आकाश किशोर देविकर यांनी वैद्यकीय शिक्षणामध्ये मोठे यश मिळवले. त्यांनी MBBS आणि MD (Medicine) या दोन्ही पदव्या संपादन करून शहराचा मान वाढवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या यशामुळे मूर्तीजापूरमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या खास क्षणाचे औचित्य साधून माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे आणि नगरसेवक कैलास भैय्या महाजन यांनी डॉ. आकाश देविकर यांचे अभिनंदन केले. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना द्वारकाप्रसाद दुबे म्हणाले, “डॉ. देविकर यांचे हे यश मूर्तीजापूर शहरासाठी एक मोठी अभिमानाची बाब आहे.” तर कैलास महाजन यांनी, “डॉ. देविकर यांनी भविष्यातही अशीच प्रगती करत राहावी आणि आपली चिकित्सा सेवा उत्तम प्रकारे सुरू ठेवावी,” अशा शुभेच्छा दिल्या.
डॉ. देविकर यांच्या रूपाने मूर्तीजापूर शहराला एक कर्तृत्ववान आणि सुशिक्षित डॉक्टर मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.