
अमरावती: श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी अमरावतीमध्ये महाकालच्या कृपेने पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात त्रिकालदर्शी कावड यात्रा काढण्यात आली. या यात्रेमुळे शहरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.ही कावड यात्रा गजानन गल्ली क्रमांक एक आणि गजानन गल्ली क्रमांक दोन येथील सर्व नागरिकांनी मिळून आयोजित केली होती. या यात्रेत सहभागी होण्यासाठी अमरावती महादेव खोली परिसर आणि आजूबाजूच्या भागातून मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते. पारंपरिक वेषात आणि भक्तीपूर्ण वातावरणात ही कावड यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.यात्रेच्या निमित्ताने महादेव खोली शिवमंदिर येथे विशेष धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मंदिराच्या गेटसमोर शिवभक्तांसाठी साबुदाण्याची खिचडी वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता, ज्याचा अनेकांनी लाभ घेतला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये *सौ. प्रतिभा गजानन खंडाळे* यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या योगदानाबद्दल आणि उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. या ऐतिहासिक सोहळ्याने अमरावतीमधील धार्मिक आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

