
मूर्तिजापूर: स्व. भोला शंकर हिरालाल गुप्ता, माजी उपनगराध्यक्ष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पीएम श्री स्व. रामदास भैय्या दुबे नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि बूट बॉक्सचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मा. श्री. द्वारका प्रसाद दुबे, माजी नगराध्यक्ष यांच्या पुढाकाराने आणि देणगीदारांच्या उपस्थितीत संपन्न झाला.



यावेळी नायब तहसीलदार देविदास पल्लडवाड, माजी नगराध्यक्षा मोनालीताई कमलाकर गावंडे, उमेश नंदलाल शाहू (राष्ट्रीय अध्यक्ष राठोड महासभा), नरेश बेंबरे, इब्राहिम भाई घाणीवाला, संदीप जळमकर, राहुल गुल्हाने, संजय भोला शंकर गुप्ता, संजय मोरे, सुभाष म्हेसने, कैलास महाजन, देविदास गोळे , रमेश पालीवाल काका, रामाभाऊ हजारे, पुष्पक हांडे, पत्रकार विलास सावळे, अनवर भाई, रावसाहेब कांबे, कमलाकर गावंडे, बाबूलाल यादव, किडे मॅडम, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गाडगे महाराजांना पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी पुष्पहार देऊन मान्यवरांचे स्वागत केले. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य आणि बूट बॉक्सचे वाटप करण्यात आले.

