शैक्षणिक मदतीसाठी देवदूत ठरल्या अमरावती जिल्ह्यातील प्रा. लाजवंती श्रद्धानंद चावला व त्यांचा सहपरिवार

सविस्तर माहिती अशी कि, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , जिल्हा महिला व बालविकास कार्यालय , ॲसेस टू जस्टीस प्रकल्प ISWS, अकोला यांच्या संयुक्त विधमाने गरजू बालकांना शैक्षणिक मदत व कायदेविषयक कार्यशाळा जिल्हा महिला व बालविकास भवन अकोला येथे पार पडली.
शैक्षणिक मदतीसाठी देवदूत ठरल्या अमरावती जिल्ह्यातील प्रा. लाजवंती श्रद्धानंद चावला
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित बालकांना माण्यावरण कडून बालकांचे कायदे विषयक मार्गदर्शन करून , बालकांची सुरक्षितता , बालकांचे हक्क अधिकार याबाबत जाणीव जागृती करण्यात आली. तसेच बालकामगार , बाल तस्करी, बाल लैंगिक शोषण, व बाल विवाह थांबविण्यासाठी उपाय योजन बाबत माहिती देण्यात आली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी बालकांच्या आर्थिक ,शैक्षणिक समस्या अडचणी आहेत त्या करिता सर्व समाजातील घटकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानंतर जवळ पास २०० गरजू बालकांना प्राध्यापक लाजवंती श्रद्धानंद चावला अमरावती यांच्या मदतीने शैक्षणिक साहित्य देण्यात आले. त्यांनी कोशिश करणे से हार नही होती , कोशिश करणा मेहनत करणा , जो भी मिला है उसको स्वीकार करणा असा संदेश बालकांना दिला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे चैतन्य बाळापुरे व बालकल्याण समिती अध्यक्ष यांनी त्यांच्या कार्याच्या विषयी मार्गदर्शन केले. बालकांच्या मदतीसाठी आपत्कालीन सेवा चाईल्ड लाईन १०९८ बाबत माहिती देण्यात आली. तसेच बेटी बचाव बेटी पढावो चा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला मोलाचे मार्गदर्शन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लादुलकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला यांनी केले, प्रास्ताविक जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे चैतन्य बाळापुरे , बालकल्याण समिती अध्यक्ष अनिता गुरव, बाल न्याय मंडळाच्या सदस्य सारिका गिरनीकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी निवास पाटील , सहाय्यक लेखपाल वायचाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लादुलकर , सुनील लाडूलकर ,जिल्हा संरक्षण अधिकारी रुपाली पांडे, सामजिक संस्थेचे प्रतिनिधी शुभांगी लाडूकर यांची उपस्थिती लाभली . कार्यक्रमाचे नियोजन ॲसेस टू जस्टीस प्रकल्प ISWS, अकोलाचे शंकर वाघमारे , सपना गजभिये , विशाल गजभिये, पूजा पवार, राजश्री किर्तीवार , पूजा मनवर ,चाईल्ड लाईनच्या हर्षाली गजभिये, विधा उंबरकर यांनी केले.