
अमरावती श्याम नगर, फ्रेझर – M.N.P. उर्दू मिडिल स्कूल क्रमांक ५ मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध कार्यक्रम सादर केले. लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुम्मा मामा होते, तर मो. शरीफ, उमेश रायकर, गोलू भाई आणि रमजान चौधरी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन विद्यार्थिनी लायबा परवीन हिने केले. याप्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक मुख्तार सर यांनी, शाळा डिजिटल करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासन आणि शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम सर यांचे आभार मानले.
शाळेच्या शिक्षिका कायनात मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी तयार केले आणि शेवटी आभारप्रदर्शनही केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पाहुण्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
