
मुर्तीजापूर: श्री जहारवीर भोगाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात आयोजित जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात वाल्मिकी सेना आणि महाकाल सेनेच्या वतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन वाल्मिकी सेनेचे अध्यक्ष बंटी भाऊ धामणे आणि महाकाल सेनेचे अध्यक्ष लखन भाऊ मिलांदे यांनी केले. त्यांच्यासोबतच सरपंच रवी भाऊ सारवन यांनीही सहभाग घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मुर्तीजापुर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष हर्षल साबळे,आमदार हरीश भाऊ पिंपळे, कमलाकर भाऊ गावंडे, किशोर भैय्या ठाकूर,रितेश भैय्या सबाजकर, राहुल भैया गुल्हाने, द्वारका भैय्या दुबे, अतिश भैय्या महाजन यांच्यासह शालिग्राम यादव, विजय भाऊ लाकडे, गोपाल शर्मा, राहुल अग्रवाल, गोलू बुंदुले,आदींचा समावेश होता. या सर्व मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी जहारवीर भोगाजी महाराजांच्या कार्याला आदराने उजाळा दिला आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमामुळे समाजात एकोपा आणि सलोख्याचा संदेश प्रसारित झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.