मूर्तीजापूरमध्ये राणी सती दादीचा मंगल पाठ उत्साहात संपन्न
मूर्तीजापूर: येथील भाद्रपद महिन्याच्या निमित्ताने माँ राणी सती दादीचा मंगल पाठ आयोजित करण्यात आला होता. या मंगल पाठात ‘माँ राणी सती दादी मंगल पाठ’ ग्रुपमधील महिलांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभाग घेतला. धार्मिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाने परिसरात चैतन्य आणि आनंद संचारला.
दादीजींच्या मंगल पाठाचे पठण झाल्यानंतर, उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सौ. ज्योती केदारजी शर्मा, सौ. माया संजयजी वर्मा, सौ. पूनम प्रवीण वर्मा, सौ. माधुरी गोविंदजी वर्मा, सौ. ज्योती गोपालजी वर्मा, सौ. किरण मोहनलालजी शर्मा, सौ. संतोषजी सीतारामजी खंडेलवाल, सौ. रीना रविंद्र अग्रवाल, सौ. डॉ. रश्मी विक्रमजी शर्मा, सौ. सरोज सुनील अग्रवाल, सौ. गुंजन रुपेश शर्मा, सौ. वनिता अनिलजी शर्मा, सौ. रूपाली दिलीपजी वर्मा, सौ. सुनीता रमेश झरोदिया, सौ. छाया दामोदरजी लता, सौ. आशा संजय शर्मा, सौ. रेखा श्यामजी उपाध्याय, सौ. आशा आनंद भरूका, सौ. मोनू शर्मा, सौ. नेहा राजेश निमोदिया, सौ. कविता संतोष निमोदिया, सौ. पूनम निमोदिया, सौ. मीना गोपाल अग्रवाल, सौ. वर्षा किशन शर्मा, सौ. सरला निमोदिया, सौ. संगीता मनोज अग्रवाल, सौ. प्रीती योगेश अग्रवाल, सौ. पूजा दिनेश निमोदिया यांच्यासह परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिलांनी विशेष परिश्रम घेतले. अशा कार्यक्रमांमुळे धार्मिक परंपरा जपली जाते आणि समाजात एकोपा वाढतो, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

