मूर्तिजापूर नगरपरिषद मार्फत शहरात संदीप जळमकर यांच्या उपस्थितीत रोगराई टाळण्यासाठी विशेष फवारणी मोहीम

0
25

मूर्तिजापूर: शहराला रोगराईमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर यांच्या पुढाकाराने आणि उपस्थितीत आज मूर्तिजापूर नगर परिषदेने प्रभाग क्रमांक १२ मध्ये विशेष फवारणी मोहीम राबवली. नागरिकांच्या मागणीनुसार तिडके नगर आणि समता नगर परिसरात ही फवारणी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून या भागात डास आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. याची दखल घेत जळमकर यांनी तातडीने नगर परिषदेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे, आज २१ ऑगस्ट रोजी सकाळीच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरात कीटकनाशक फवारणी केली.

संदीप जळमकर हे नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे आणि संवेदनशील भूमिकेमुळे शहरात त्यांचे कौतुक होत आहे.

या मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला असून, आरोग्यविषयक समस्या कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here