मूर्तिजापूर :आई -मुलाच्या बेपत्ता प्रकरणी पोलीस तपासावर प्रश्न चिन्ह

0
15

मूर्तिजापूर शहरातील डागा हॉस्पिटल परिसरातून आई -मुलगा रहस्यमयरित्या बेपत्ता झालें.अजून सुद्धा पोलीस तपास ठोस निष्कर्ष्यापरेंत पोहचलेले नाही, 19 ऑगस्ट रोजी, राणी राहुल भटकर (वय 27,रा.शिवरखेड )आणि मुलगा शौर्य (वय 4 वर्ष ) अचानक गायब झालें.या घटनेची फिर्याद मंगळळ काव येथील सुशीलाबाई तायडे यांनी दिली असून गु. र -35/2025 दाखल करण्यात आला मात्र 22ऑगस्ट पर्यंत सुरु असलेल्या शोधमोहिमे नंतरही आई व मुलाचा पत्ता लागला नाही,त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे कि मूर्तिजापूर पोलीस तपास योग्य दिशेने चालवतात कि केवळ औपचारिकता पार पाडत आहेत.बेपत्ता प्रकरणात सुराग मिळण्यात अपयश आल्याने पोलिसांच्या कार्यक्ष मतेवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झालें आहेत.या प्रकरणाचा तपास पी,एस, आय,सूर्यवंशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here