
चिखली, (तालुका प्रतिनिधी): येथील मातंग समाज आणि राष्ट्रीय लहुशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य ब्रास बँड स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. डीजेच्या कर्कश आवाजाच्या आजच्या काळात पारंपरिक लोककला आणि वाद्यकला जपण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे, हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.या स्पर्धेमध्ये बुलढाणा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यांमधून अनेक ब्रास बँड पथकांनी सहभाग घेतला. या पथकांनी सादर केलेल्या पारंपरिक वाद्यांच्या सुरावटींनी उपस्थितांची मने जिंकली. चिखलीतील नागरिकांनीही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारंपरिक वाद्यकलेचा मनमुराद आस्वाद घेतला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. एक आगळावेगळा आणि यशस्वी कार्यक्रम समाजासमोर सादर केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. पारंपरिक कलेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम भविष्यातही प्रेरणादायी ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
