
मूर्तिजापूर – दैनंदिन जीवनातील ताण कमी करून नागरिकांना विरंगुळा मिळावा या उदात्त हेतूने मूर्तिजापूर येथील राधा मंगलम तिडके नगर येथे एका खास रोमँटिक सॉंग ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात रितेश शर्मा (पिंकू), गजानन वरघट, ज्ञानेश टाले, जितू चौबे, इम्रान भाई, इस्माईल भाई घाणीवाले आणि रवी गोडकार या आयोजकांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या प्रयत्नांना माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद भैय्या दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे अधिकच बळ मिळाले.
या संगीत मैफिलीचा आनंद घेण्यासाठी मूर्तिजापूरच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. द्वारकाप्रसाद भैय्या दुबे यांनी स्वतः या कार्यक्रमाची प्रशंसा करत, आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांच्यासोबत कैलाश महाजन, सुनील पवार, संजयजी गुप्ता, कमलाकर गावंडे, रितेश सबाजकर, बाळासाहेब खांडेकर, विनायक गुल्हाने यांच्यासह सचिन देशमुख, रोहित अवलवार, अविन अग्रवाल, प्रशांत हजारी, नंदकिशोर राऊत, अनिल बियाणी, वैभव वानखेडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजकांनी महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित बैठक व्यवस्था केली होती, ज्यामुळे सर्वच उपस्थितांनी शांत आणि आनंददायी वातावरणात या कार्यक्रमाचा अनुभव घेतला. रविवार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुरू झालेला हा ऑर्केस्ट्रा मूर्तिजापूरकरांसाठी एक अविस्मरणीय संगीताची मेजवानी ठरला.
