
अकोला….मुर्तीजापुर तालुक्यातील ग्राम खरब ढोरे येथील येथील शेतकरी राजेंद्र ज्ञानदेवराव ढोरे यांनी ढग सदृश्य पावसामुळे आपल्या शेतामधून वाहणाऱ्या खोराड नदी नाल्याचे पुरामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपल्यावरील बँकांच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला या युवचनेतून सकाळी आठ वाजता त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हे महायुतीचे सरकार किती शेतकऱ्यांचा बळी घेणार….? शासनाने कर्जमाफीच्या निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर शेतकऱ्यांनी या सरकारला निवडणुकीत त विजय मिळून दिला. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांना या मूर्तिजापूर येथे प्रचार सभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करू असे आश्वासन भरगच्च सभेत दिले होते. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शेतकऱ्यांचे आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना. अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंब रस्त्यावर आले आहे. देवेंद्र भाऊ तुम्ही शेतकऱ्यांच्या पत्नीचे कुंक पुसण्याचे फार मोठे पाप धनी होता हा. राज्य शासनाने कर्जमाफी करावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा अशी जनसामान नागरिकांची मागणी आहे.