युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या केळापूर तालुका अध्यक्षपदी प्रफुल नांन्ने यांची निवडउपाध्यक्षपदी चेतन सामजवार तर सचिवपदी परवेज खान यांची नियुक्ती

0
24

प्रतिनिधी, नरेश राऊतपांढरकवडा: युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या केळापूर तालुका अध्यक्षपदी प्रफुल नांन्ने यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत चेतन सामजवार यांची उपाध्यक्षपदी, तर परवेज खान यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या आदेशानुसार, ३ सप्टेंबर २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली.या बैठकीत केळापूर तालुक्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे संघटनेच्या कामाला गती मिळेल आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बैठकीला संघाचे सदस्य सागर व्यास, गणेश बेतवार, सोहेल खान आणि समशेर अंसारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here