डाक विभागाची बचत उत्सव मोहिमसुकन्या समृध्दी खाते उघडण्याचे आवाहन

0
23

अमरावती, दि. 9 (जिमाका) : अमरावती डाक विभागातर्फे बचत उत्सव विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यात मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी खाते उघडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाक विभागात सुकन्या समृध्दी योजना सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पालक आपल्या 10 वर्ष वयापर्यंतच्या मुलींचे खाते डाकघरात किमान 250 रूपये भरून उघडू शकतात. योजनेचा सध्याचा व्याजदर 8.2 टक्के असून सदर खाते काढण्याकरीता मुलीचा जन्माचा दाखल, आधार कार्ड, तसेच पालकाचे आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.जिल्ह्यातील डाक अधिकारी, कर्मचारी, शाळा, अंगणवाडी तसेच घरोघरी जाऊन मुलीच्या उज्वल भविष्यासाठी जनजागृती करत आहेत. पालकांनी आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडावे, तसेच डाक विभागाच्या इतर बचत योजनांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here